चंदीगड- पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तान विषयी संतापाचे वातावरण आहे. अनेक स्तरावरील लोकांनी पाकिस्तानवर हल्ला करावा, त्यांची कोंडी करावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. यातच आता पाकिस्तानकडून होणारी मालवाहतूक थांबवण्यात आली आहे. सर्व व्यापारी वाहतूक संघटनांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देऊन पाकिस्तानची गोची करण्याचा प्रयत्न केला आहे.
अटारी-वाघा बॉर्डवरुन पाककडून होणारी आयात रोखली; व्यापारी संघटनांचा निर्णय - वाहतूक
अटारी-वाघा सीमेवरुन पाकिस्तानमधून येणाऱ्या मालाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. येथील मालवाहतूक थांबवण्याचा निर्णय भारतातील सर्व व्यापारी वाहतूक संघटनांनी घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे.

भारत सरकारच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आश्चर्य वाटते की, काश्मीरमधील भू-व्यापारी मार्ग अद्याप कसे खुले ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर बंदी घालायला हवी. सरकार त्यावर बंदी घालू शकतो, असे वाहतूक व्यापारी राजदीप उप्पल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.