नवी दिल्ली- जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे ग्वाल्हेरच्या युवकाचे शव दुबईत अडकल्याने त्याच्या कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबबत 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लागलीच प्रशासन जागे होत युवकाचा मृतदेह अखेर ग्वाल्हेरला आणला आहे. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : अखेर एका महिन्यानंतर युवकाचा मृतदेह दुबईवरून ग्वाल्हेरला
ही बाब 'ईटीव्ही भारत'ने समोर आणली. त्यावर माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कपिलचा मृतदेह भारतात आणण्यास मदत केली.
महिनाभरापूर्वी ग्वाल्हेरच्या कपिल गर्ग यांचे दुबईत निधन झाले. कपील दुबईमध्ये इंडिया कंपनीत काम करायचा. कपिलचे नेपाळमधील सीमेवरील रहिवासीशी लग्न झाले होते. कौटुंबिक वादामुळे कपिलने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे कपिलचे कुटुंब दुबईला जाऊ शकले नाही. ज्यामुळे कपिलचा मृतदेह गेल्या एक महिन्यापासून दुबईमध्ये होता. कोरोनामुळे दुबईमध्येही हवाई उड्डाणे बंद असल्याने कपिलचा मृतदेह परत भारतात आणता येत नव्हता. भारत सरकारनेही याकडे दुर्लक्ष केले होते.
ही बाब 'ईटीव्ही भारत'ने समोर आणली. त्यावर माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कपिलचा मृतदेह भारतात आणण्यास मदत केली. त्यानंतर आज कपिलाचा मृतदेह मालवाहू विमानाने दिल्लीला आणण्यात आला आणि दिल्लीहून रुग्णवाहिका ग्वाल्हेरला पोहोचली. आज तरूणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.