नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसांठी दिलासादायक वृत्त आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असे आयएमडीने म्हटले आहे. एल निनोचा प्रभाव कमी राहिल, असेही आयएमडीने म्हटले आहे.