महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र अन् गुजरातमधील विविध भागात जोरदार पावसाचा इशारा - Cyclone 'AMPHAN'

येत्या 24 तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्र आणि लक्षद्विपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला गती मिळणार आहे.

winds
winds

By

Published : May 31, 2020, 2:03 PM IST

नवी दिल्ली - येत्या 24 तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्र आणि लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला गती मिळणार आहे. येत्या 3 जूनपर्यंत महाराष्ट्र व गुजरातमधील विविध भागात चक्रीवादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामानाची माहिती देणार्‍या विंडी डॉट कॉमच्या मते, गुजरातध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ आले तर ते द्वारकामार्गे कच्छ-कांडलाच्या आसपासच्या भागात जाऊन राजस्थानच्या दिशेने जाईल. चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

सध्या चक्रीवादळ ओमान-यमेन जवळ केंद्रित आहे. खासगी हवामान निरीक्षक संस्था विंडी डॉट कॉमनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ येत्या चार दिवसांत गुजरातच्या दिशेने वाटचाल करेल.

30 मे ते 2 जून दरम्यान दक्षिण द्विपकल्प, भारतातील काही भागांत मुसळधार पाऊस पडेल. केरळ आणि लक्षद्वीप येथे 30 मे ते 1 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मच्छीमारांना 31 मे ते 4 जून दरम्यान दक्षिण पूर्व आणि पूर्व मध्य अरब समुद्रामध्ये जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details