महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा - केरळ पाऊस

राजधानी तिरुवनंतपुरममध्ये मंगळवारी रात्रीपासून आज (बुधवार) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडला. शहरात 4 से.मी पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. तर कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात काल रात्री 20 आणि 15 सेमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 29, 2020, 7:56 PM IST

तिरुवनंतपूरम- हवामान खात्याने केरळमधील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्यासंबंधी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. 29 आणि 30 जुलैला कोलाम, तिरुवअनंतपुरम, पथ्थनमिट्टा, इदुक्की, मल्लापुरम, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यात मुसळाधार पाऊस होणार असल्याचा इशार हवामान खात्याने दिला आहे.

अल्लापुझा, कोट्टायम, एर्नाकूलम, थ्रिसूर, पल्लकड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांसाठी येत्या काही दिवसांत 'येलो अलर्ट' हवामान विभागाने दिला आहे. ऑरेंज इशारा म्हणजे खडतर हवामानासाठी तयार रहा असे सांगण्यात येते. तर यलो अलर्ट म्हणजे परिस्थितीची अद्यायावत माहिती ठेवा, असा संदेश देण्यात येतो.

राजधानी तिरुवनंतपुरममध्ये मंगळवारी रात्रीपासून आज(बुधवार) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडला. शहरात 4 से.मी पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. तर कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात काल रात्री 20 आणि 15 सेमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

2018 चा भयंकर मान्सून

2018 साली मुसळधार पावसाने केरळ राज्यात मोठा विध्वंस केला होता. यामध्ये सुमारे 400 बळी गेले होते, तर मालमत्तेचेही नुकसान झाले होते. तर मागील वर्षी केरळच्या उत्तर भागातही मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यात 120 जणांचा बळी गेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details