महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इंडियन मिलिटरी अ‌‌‌‌‌ॅकेडमी पासिंग आऊट परेड; देशाला मिळाले 377 तरुण अधिकारी - इंडियन मिलिटरी अ‌‌‌‌‌ॅकेडमी पासिंग आऊट परेड

गेल्या 29 नोव्हेबर पासूनच आयएमए येथे कार्यक्रम सुरु झाले होते. यावेळी पासिंग आउट परेडमध्ये 377 तरुण अधिकारी देशसेवेत रुजू होतील. त्यातील 306 अधिकारी हे भारतीय सेनेत समाविष्ट होतील. तसेच मित्र देशातील 71 कैडेट्स त्यांच्या देशातील सेनेत रुजू होतील.

IMA passing out parade in dehradun
इंडियन मिलिटरी अ‌‌‌‌‌ॅकेडमी पासिंग आऊट परेड

By

Published : Dec 7, 2019, 11:33 AM IST

देहरादून - आज (शनिवारी) येथील इंडियन मिलिटरी अॅकेडमीची पासिंग आऊट परेड पार पडली. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री त्रिवेद्र रावत यांचीदेखील उपस्थिती होती.

इंडियन मिलिटरी अ‌‌‌‌‌ॅकेडमी पासिंग आऊट परेड

गेल्या 29 नोव्हेंबर पासूनच आयएमए येथे कार्यक्रम सुरु झाले होते. यावर्षी पासिंग आउट परेडमध्ये 377 तरुण अधिकारी देशसेवेत रुजू होतील. त्यातील 306 अधिकारी हे भारतीय सेनेत समाविष्ट होतील. तसेच मित्र देशातील 71 कैडेट्स त्यांच्या देशातील सेनेत रुजू होतील. यावर्षी राज्यातील 19 युवा अधिकारी भारतीय सेनेत सामिल होणार आहेत. तर देशात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक तरुण अधिकारी झाले आहेत. त्यांची संख्या 56 इतकी आहे.

हेही वाचा -महिलेला पोलिसांचा धक्कादायक सल्ला; ‘तो’ पुन्हा तुमच्याकडे आल्यावर बोलवा! मग कारवाई करू

मित्रदेशातील सर्वात जास्त कैडेट्सची संख्या अफगाणिस्तान देशाची आहे. त्या देशातील कैडेट्सची संख्या 47 इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भूतान हा देश आहे. या देशातील 12 तरुण अधिकारी त्यांच्या देशसेवेसाठी रुजू होतील.

हेही वाचा- #HyderabadEncounter चौकशीनंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल - एन्काऊंटर स्पेशलिस्ट रवींद्र आंग्रे

राज्यानिहाय कैडेट्सची संख्या -

उत्तर प्रदेश - 56, हरियाणा - 39, बिहार - 24, राजस्थान - 21, उत्तराखंड - 19, महाराष्ट्र - 19, हिमाचल - 18, दिल्ली - 16, पंजाब - 11, मध्य प्रदेश - 10, केरळ - 10, तामिळनाडू - 9, कर्नाटक - 7, आंध्रप्रदेश - 6, जम्मू-काश्मीर - 6, पश्चिम बंगाल - 6, तेलंगणा - 5, मणिपुर - 4, चंडीगढ़ - 4, झारखंड - 4, आसाम - 2, अंदमान निकोबार - 1, मिझोरम - 1, उडीसा - 1, सिक्किम - 1.

ABOUT THE AUTHOR

...view details