महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'शिवसेना नक्कीच हिंदुत्वाबाबत काँग्रेसची भूमिका बदलेल' - काँग्रेस-शिवसेना युती

उद्धव ठाकरे यांना मी जेवढे ओळखतो, त्यावरून ते सत्तेसाठी आपली हिंदुत्ववादी विचारसरणी सोडणार नाहीत. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरूनही ते मागे हटणार नाहीत, असे सावरकर यांचे नातू रणजीत यांनी म्हटले आहे.

I'm confident, Shiv Sena will change Congress' stance on Hindutva Says grandson of Veer Savarkar

By

Published : Nov 15, 2019, 5:18 PM IST

नवी दिल्ली -काँग्रेससोबत गेल्यावरही उद्धव ठाकरे आपली हिंदुत्ववादी विचारसरणी सोडणार नाहीत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत यांनी म्हटले आहे. तसेच, हिंदुत्वाबाबत काँग्रेसची असलेली भूमिका शिवसेना नक्कीच बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे यांना मी जेवढे ओळखतो, त्यावरून ते सत्तेसाठी आपली हिंदुत्ववादी विचारसरणी सोडणार नाहीत. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरूनही ते मागे हटणार नाहीत, असे रणजीत पुढे म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तापेचात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एक वेगळी आघाडी पुढे येण्याची अधिक शक्यता दिसत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना हे दोन संपूर्ण वेगळ्या विचारसरणीचे पक्ष असल्याने हे कसे शक्य होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details