रुर्की- अवघं जग कोरोनाशी लढत आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात यावर लस शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आयआयटी रुर्की येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये तो व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही हे अवघ्या 3 ते 4 सेकंदामध्ये समजणार आहे.
कोरोना डिटेक्टर...अवघ्या 3 ते 4 सेकंदात होणार कोरोना चाचणी, आयआयटी रुर्कीने तयार केले सॉफ्टवेअर - आयआयटी रुर्की
आयआयटी रुर्की येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये तो व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही हे अवघ्या 3 ते 4 सेकंदामध्ये समजणार आहे.

आयआयटी रुर्कीचे प्रोफेसर कमल जैन यांच्या दाव्यानुसार, कोरोना डिटेक्शन हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, यामार्फत रुग्णाचा कोरोना अहवाल अवघ्या 3 ते 4 सेकंदामध्ये तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे समजणार आहे. त्या व्यक्तीचा एक्सरे या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करावा लागतो आणि त्यानंतरच त्याबाबतची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये समजते, असे प्रोफेसर कमल जैन यांनी सांगितले. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कमी वेळात जास्ती कोरोना चाचण्या करता येतील व याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकेल, असा विश्वास कमल जैन यांनी व्यक्त केला आहे.