चेन्नई - येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या (आयआयटीएम)संशोधकांनी जैविक इंधन, तेल तयार करण्यासाठी एक सोपी मायक्रोवेव्ह प्रक्रिया विकसित केली आहे. याची माहिती त्यांनी सोमवारी एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली. या जैविक इंधनाची निर्मिती ही तांदळाची पेंढी, उसाचे फड, धानाचा भूसा, शेतातील झुडपं, गवत आणि खराब झालेल्या प्लास्टिकच्या माध्यामातून तयार करण्यात आल्याचे आयआयटीएमने या परिपत्रकात म्हटले आहे. या प्रकल्पाकरता गेल (इंडिया) लिमिटेडने अर्थसहाय्य दिले.
पृथ्वीवरील वाढती वाहतूक, उद्योगधंदे आणि त्यामुळे होणारे प्रदुषण हा एक गंभीर प्रश्न आहे. हे यातच, मानवनिर्मीत प्लास्टिक सारख्या अविघटनशील प्रदार्थांमुळे प्रदुषणात आणखी भर पडली आहे. मात्र, आयआयटीएमच्या संशोधकांनी या कचऱ्यापासून जैविक इंधनाची निर्मिती केली आहे. नवीकरणीय जैविक स्त्रोतांमधून तयार होणारे जैविक इंधन हे भविष्यातील पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्ससाठी एक व्यावहारिकदृष्ट्या मदतशील राहिल असेही आयआयटीएमने सांगितले. या तेलाच्या निर्मीतीची संशोधन प्रक्रिया ही डॉ. आर. विनू, रसायन अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि इतर सदस्य डॉ.डी.डी.सूर्यप्पाराव आणि बानुप्रिया बरुआह होते, यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली.
या संशोधनाबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ. आर. विनू म्हणाले, "बायोमास पर्यावरणावर शून्य कार्बन फूटप्रिंट असलेल्या ऊर्जा, रसायने आणि पदार्थांच्या उत्पादनाची अपार संभाव्यता असलेले पृथ्वीवरील कार्बनचे एकमेव नूतनीकरण स्रोत आहे. या तेलाच्या निर्मीतीकरता शेतातील कचरा ज्यामध्ये तांदळाचे धांडे, उसाचे चीप, लाकडाचे तुकडे आदींचा वापर करण्यात आला आहे.''प्लास्टीकमध्ये हायड्रोजनचे प्रमाण अधिक असते, जे कमी-ऑक्सिनेट बायो-तेलांमध्ये रूपांतरित करण्यासाठी बायोमास करण्यासाठी हायड्रोजन पुरवठादार म्हणून काम करू शकते.
बायोमासच्या पायरोलिसिसमध्ये सहाय्यक साहित्याचा म्हणून प्लॅस्टिकचा उपयोग दोन उद्देशाने केला जातो. एक यामुळे बायो-ऑइल चांगल्या गुणधर्मांसह तयार होईल आणि दोन म्हणजे वापरलेल्या प्लास्टिकची पुनर्उत्पादनास मदत होईल. प्लास्टिकचे बायोमास आणि को-पायरोलिसिस, इंधनाचे उष्मांक वाढवण्याव्यतिरिक्त, इंधनाची कार्यक्षमता आणि उत्पन्न वाढवते, असे ते म्हणाले.
आयआयटीएमच्या संशोधकांनी याकरता मायक्रेव्हेवचा वापर करण्याचे ठरवले. मायक्रोवेव्ह हे लवकर उष्ण होऊन त्यात ठेवलेले को-पायरोलिस बायोमास आणि प्लास्टिक हे लगेच गरम होऊन वितळते. यामुळे, त्यांचा त्यांचा या कार्यासाठी लागणारा वेळ आणि ऊर्जेची बचतदेखील झाली. यानंतर संशोधकांनी तांदळाची पेंढी, ऊसाची चिप, शेंगदाण्याची टरफले, लाकडाचा भूसा असे विविध प्रकारचे बायोमास एकत्रित करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला. यासह त्यांनी पॉलीप्रोपायलीन आणि पॉलिस्टीरिनसारखे दोन कृत्रिम प्लास्टिकदेखील वापरले. यासोबतच टीमने बायो-तेलाची गुणवत्ता वाढवण्याकरता आणि झिओलाइट कॅटालिस्टचा लाईट फ्युएल ऑइल (एलएफओ) आणि हेवी फ्युएल ऑइल (एचएफओ) मध्ये सुधार करण्यासाठी झिओलाइट कॅटालिस्टचा वापरही केला आहे.