नवी दिल्ली -जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणूसारख्या प्राणघातक रोगावर औषधे शोधत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीचे संशोधकही या प्राणघातक विषाणूवर औषध शोधण्याचे काम करत आहेत. यासाठी संस्था या संशोधकांना सुपर कॉम्प्युटर देखील वापरण्याची सुविधा देत आहे. या सुपर कॉम्प्युटरचा वापर आयआयटी दिल्लीचे संशोधक अनेक औषधांच्या शोधात आणि संशोधनात करत असतात.
हेही वाचा...#coronavirus : पिंपरी-चिंचवडमधील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण आकडा २१
कोविड-19 वर दोन संशोधन सुरु...
या संपूर्ण प्रकरणाबद्दल आयआयटीचे संचालक प्रो. व्ही. राम गोपाल राव यांनी सांगितले की, सध्या आयआयटी दिल्लीत कोविड-19 वर आधारित दोन संशोधन कामे सुरू आहेत. त्यापैकी कुसुम स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्स आणि रसायनशास्त्र विभागाचे संशोधक कोरोना विषाणूची औषधे बनविण्यात व्यस्त आहेत. ते अशा कणांवर संशोधन करीत आहेत जे विषाणूंविरूद्ध वेगवेगळ्या टप्प्यांत संघर्ष करतील आणि त्याचा प्रसार रोखू शकतील.