महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आयआयटीकडून सुपर संगणकाच्या मदतीने कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न - corona virus medicine

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) दिल्ली येथील शास्त्रज्ञही या जीवघेण्या विषाणूवरील लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. यासाठी शास्त्रज्ञांना संस्थेकडून सुपर संगणकाचा विनाशुल्क वापर करण्यास उपलब्ध करून दिला आहे.

आयआयटी
आयआयटी

By

Published : Apr 5, 2020, 1:28 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) दिल्ली येथील शास्त्रज्ञही या जीवघेण्या विषाणूवरील लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. यासाठी शास्त्रज्ञांना संस्थेकडून सुपर संगणकाचा विनाशुल्क वापर करण्यास उपलब्ध करून दिला आहे. विविध महत्त्वाच्या संशोधनामध्ये आयआयटीमधील शास्त्रज्ञ या संगणकाचा वापर करत असतात.

आयआयटी

आयआयटी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाशी संबधित दोन संशोधने सुरू आहेत. यामध्ये कुसुम स्कूल ऑफ बायोलॉजिकल साइन्स अ‌ॅण्ड डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे शास्त्रज्ञ कोरोनावर लागू पडणाऱ्या औषधाचा शोध लावण्याचे काम करत आहेत. वेगवेगळ्या स्तरांवर विषाणूशी लढण्यासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी ते सुक्ष्म कणांवर काम करत आहेत. त्याबरोबरच केमिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट आणि सेंटर ऑफ एनर्जी स्टडीज विभागाकडून एकाहून अधिक रुग्णांना वापरता येईल या प्रकारचा व्हेंटिलेटर तयार करण्याचे काम सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागण्यात आले आहेत. शोध कार्यासाठी 5 कोटींचे बजेट आहे. अशाप्रकारची दोन संशोधने सध्या सुरू असल्याची माहिती आयआयटीचे निर्देशक प्राध्यापक वी. रामगोपाल राव यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details