महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना नियंत्रित ठेण्यासाठी स्थानिक रसायनांचा वापर! - कोरोना लस

कोरोनाच्या उपचारासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या पाच औषधांसाठी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्स (एपीआय) तयार करण्यात आयआयसीटीच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. विशेष म्हणजे देशात उपलब्ध असलेल्या स्थानिक रसायनांचा वापर करुन ही औषधे तयार करण्यात आली आहेत. आयआयसीटीचे मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राजी रेड्डी आणि डॉ. प्रधाम एस. मयंकर यांनी या संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या दोघांनी संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबाबतची माहिती 'ईटीव्ही भारत'ला दिली.

Local chemicals to be used in containing coronavirus!
कोरोना नियंत्रित ठेण्यासाठी स्थानिक रसायनांचा वापर!

By

Published : May 27, 2020, 4:59 PM IST

हैदराबाद - कोरोनाच्या उपचारासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या पाच औषधांसाठी अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्स (एपीआय) तयार करण्यात आयआयसीटीच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. विशेष म्हणजे देशात उपलब्ध असलेल्या स्थानिक रसायनांचा वापर करुन ही औषधे तयार करण्यात आली आहेत. यासाठी देशातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि संशोधन करणारे विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून दिवसरात्र विशिष्ट तंत्रज्ञांसमवेत कार्यरत आहेत. आयआयसीटीचे मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राजी रेड्डी आणि डॉ. प्रधाम एस. मयंकर यांनी या संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या दोघांनी संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबाबतची माहिती ईटीव्ही भारतला दिली..

  • आम्ही सर्वात अगोदर इबोला, इन्फ्लूएन्झा आणि इतर विषाणूजन्य संसर्गावर उपचार करणारी औषधे कोरोना विषाणूवर किती प्रमाणात प्रभावी ठरतात याचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने शोधलेल्या फवीपीरावीर, रेमेडिसिव्हिर, युमीफेनोव्हिर, बोलाक्साविर, क्लोरोक्वाईन/ हायड्रोक्सीक्लोरोक्विन या पाच औषधांच्या रेणूंच्या विकासावर सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले.
  • कोविड-१९वर परिणामकारक ठरणाऱ्या औषधांचे एपीआय आम्ही या अगोदरच प्रयोगशाळेत विकसित केले आहेत. आम्ही कच्च्या मालासाठी कोणत्याही आयातीवर अवलंबून राहिलो नाही. त्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध रसायनांचा योग्य वापर केला. या पद्धतीमुळे आम्ही स्वस्त उत्पादन प्रक्रिया विकसित करु शकलो. परिणामी आम्ही औषधांच्या किंमती देखील खूप कमी ठेवल्या आहेत.
  • फवीपीरावीर (Favipiravir) हे एक जेनेरिक औषध आहे. या औषधाचा एपीआय बनवल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यांच्या आतच आम्ही महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. आम्ही विविध मार्गांनी या औषधांचा एपीआय विकसित केला आणि हे तंत्रज्ञान एका औषधी कंपनीकडे हस्तांतरित केले आहे. त्या कंपनीने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)शी संपर्क साधला. डीसीजीआयने हे औषध बाजारात आणण्यापूर्वी काही विशिष्ट चाचण्या घेण्याची शिफारस केली. रेमेडिसिव्हिर आणि युमीफेनोव्हिरसारख्या औषधांची निर्मिती करण्यासाठी आम्ही इंटरमिडियट्स (कच्च्या मालाच्या पुढील टप्पा) बनविण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. सध्या आम्ही हे तंत्रज्ञान इतर काही औषध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

हे औषध लवकरच बाजारात उपलब्ध करून दिले जाईल...

आम्हाला खात्री आहे, की कोविड-१९ विषाणूच्या उपचारासाठी आयआयसीटीने विकसित केलेल्या विविध औषधाच्या एपीआय वापरल्या जातील. आम्ही त्याचे सर्व प्रक्रियात्मक टप्पे पार करून लवकरच ही औषधे स्थानिक बाजारात उपलब्ध करुन देऊ. इतर औषधांपैकी फवीपिरावीर हे औषध लवकरच बाजारात विक्रीसाठी पोहोचेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे औषध बाजारात कधी उपलब्ध होईल हे लाँच चाचण्या आणि डीसीजीआयच्या शिफारसींवर अवलंबून आहे. आम्हाला खात्री आहे की, जर लाँच चाचण्यांचे निकाल यशस्वी झाले तर हे औषध एक ते दोन महिन्यांच्या आत बाजारात उपलब्ध होऊ शकेल.

- डॉ.राजी रेड्डी आणि डॉ.प्रथम एस. मारियाकार

ABOUT THE AUTHOR

...view details