शिमला -देशासह जगात जमिनीतील पाण्याचा स्तर घटत आहे, ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. 'जल ही जीवन है, जल है तो कल है' अशा अनेक घोषवाक्यांसह अनेक संस्था आणि सरकार पाणी वाचवण्यासाठी मोहिम राबवत आहेत, असा दावा करतात. मात्र, वास्तविकता वेगळी आहे आणि ती लपून राहिलेली नाही. मात्र, प्रश्न असा आहे की, काय जल संरक्षण करणे खऱ्या अर्थाने कठीण आहे? ज्यांना जल संरक्षण रॉकेट सायन्स वाटते त्यांच्यासाठी शिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज (आयआयएएस) सर्वात उत्तम उदाहरण आहे. ज्या जल संरक्षणासाठी अनेक सरकार प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी इंग्रजांनी 132 वर्षांपूर्वी आधीच एक व्यवस्था तयार केली होती जी आजही कार्यरत आहे. आयआयएएसची इमारतीने शिमल्यातील सुंदरतेत 1988 पासून आणखी भर पाडली आहे. देशविदेशातील अनेक विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करण्यासाठी येतात. यासोबत दरवर्षी अनेक पर्यटक या इमारतीची सुंदरता पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी याठिकाणी येत असतात. आईआईएएसच्या इमारतीजवळील हिरवा परिसर इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक आनंददायी अनुभव देऊन जातो.
132 वर्षे जुनी रेन वाटर हार्वेस्टिंग व्यवस्था -
1888 मध्ये ब्रिटिश कालावधीत या इमारतीची स्थापना झाली. यावेळी ही इमारत तत्कालीन व्हॉइसराय लॉर्ड डफलिन यांचे निवासस्थान होते. त्यानंतर आज या इमारतीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज या नावाने ओळख प्राप्त झाली आहे. 1888 मध्ये या इमारतीच्या स्थापनेसोबतच याठिकाणी एक रेन वाटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवण्याची व्यवस्था बसविण्यात आली होती. याअंतर्गत जमिनीच्या आत मोठमोठ्या टाक्या तयार करण्यात आल्या. त्यांना इमारतीत लावण्यात आलेल्या पाईप्स यांना जोडण्यात आले आहे. यामाध्यमातून पावसाळ्यात इमारतीच्या छतावर जमा होणारे पाणी या टाक्यांमध्ये भरले जावे ज्यामुळे हे पावसाळ्यातील हे पाणी वाया न जाता भविष्यात या पाण्याचा योग्य तो वापर करण्यात यावा.
30 एकर हिरव्यागार बागायतीचे करण्यात येते सिंचन -
या टाक्यांमध्ये जमा होणाऱ्या पाण्याच्या उपयोग सिंचनासाठी केला जातो. तुम्हाला आश्चर्च वाटेल की, आयआयएएस इमारतीचा परिसर जवळपास 99 एकरात पसरलेला आहे. यातील 30 एकरात बाग, बगिचे तयार करण्यात आले आहे. या बाग बगिच्यांना वर्षभर या पावसाळ्यात साठवलेल्या पाण्याच्या माध्यमातून सिंचन करण्यात येते.
आजही काम करतेही ही व्यवस्था -
आयआयएएसची निर्मिती 1884 मध्ये सुरू झाली होती. या माध्यमातून 1888 मध्ये ही इमारत तयार झाली. लोक निर्मिती विभागाचे एक वास्तुकार हेरी इरविन यांनी या इमारतीची डिझाइन तयार केली होती. या इमारतीच्या निर्मितीसोबतच याठिकाणी डोंगर परिसरात तयार झालेल्या या इमारतीत पावसाळ्यात येणारे पाणी साठवण्याची एक व्यवस्था तयार करण्यात यावी. इंडो गौथिक शैलीमध्ये तयार झालेल्या या इमारतीत पाणी साठवण्यासाठी सहा टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. यातील चार मोठ्या टाक्यांमध्ये पावसाळ्यात येणारे पाणी साठवले जाते. त्यांची क्षमता 12 लाख गैलन इतकी आहे. वेळेनुसार अनेक वेळा या व्यवस्थेला अद्ययावत पण करण्यात आले आहे. आधी याठिकाणी बगिच्यांना पाणी पुरवण्यासाठी पाईपचा वापर करण्यात येत होता. मात्र, आता बगिच्यातील एका मोठ्या हिस्स्याला फव्वाऱ्याच्या माध्यमातून पाणी देण्यात येते. अशी व्यवस्था याठिकाणी तयार झाली आहे. मागील 132 वर्षांपासून ही व्यवस्था आपली व्यवस्था व्यवस्थितपणे कार्यरत आहे. यापुढे या व्यवस्थेला आणखी अद्ययावत करण्याचे नियोजन सुरू आहे.
2018 च्या जलसंकटात झाली होती मदत -