टेक डेस्क - अनेकदा असे होते,की आपण एटीएममधून पैसे काढतो आणि खात्यातून पैसे कपात होतात मात्र हातात पैसा येत नाही. अशावेळेस आपण गोंधळून जातो. मात्र अशावेळी घाबरून जाऊ नका. तुमचा पैसा सुरक्षित असतो आणि तुम्हाला तो निश्चितच मिळणार केवळ तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील.
काय म्हणते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
आरबीआयच्या नियमांनुसार जर तुम्ही कोणत्या एटीएममधून पैसे काढता आणि तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात मात्र तुम्हाला पैसे मिळत नाही तर ते पैसे तुम्हाला नक्की परत मिळतील. मात्र यासाठी काही अटींची पूर्तता तुम्हाला करावी लागेल.
एटीएममधून पैसे काढताना जर पैसे कपात झाले आणि मिळाले नाही तर तुम्ही संबंधित बँकेत जाऊन याची माहिती द्या. जर बँक बंद असेल तर तुम्ही कस्टमर केअर नंबरवर कॉल करुन याची माहिती द्या.
ट्रान्जॅक्शन फेल झाल्याच्या तक्रारीनंतर बँक १ आठवड्याच्या आत तुमचे पैसे वापस करणार किंवा पैसे का कपात झाले याचे कारण ही सांगणार. मात्र यासाठी गरजेचे आहे,की तुम्ही बँकेला ट्रान्जॅक्शन फेल झाल्याची स्लिप दाखवा आणि जर स्लिप मिळाली नसेल तर बँकेच्या स्टेटमेन्टचा वापर करा.
ट्रान्जॅक्शन फेल झाल्याच्या स्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला कमीतकमी २४ तास वाट बघावी लागेल जर तरीही बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर बँकेच्या शाखेत एक लिखित तक्रार करा. तुमच्या तक्रारीच्या १ आठवड्यानंतर तुमच्या खात्यात पैसे परत जमा होतील. जर असे झाले नाही तर बँक रोज तुम्हाला १०० रुपये भुर्दंडच्या स्वरुपात देणार, असा नियम असल्याचे समजते.