दामोह - लोकसभा निवडणुकीचा ५ वा टप्पा तोंडावर आलेला असतानाच मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यामधील समदाई या गावातील लोकांनी तातडीने पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे. गावात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तलावाची मागणी करण्यात आली आहे. ती पूर्ण न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पाणी नाही तर, मतही नाही; दामोह ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार - threat
याआधी दामोह जिल्ह्यामधील १८ गावांतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तलावाची मागणी केली होती. मात्र, अद्याप यावर काहीच झालेले नाही. 'आम्ही पाण्यासाठी तासन् तास भटकत राहतो. आमच्या गावात पाण्याची पर्यायी सोय उपलब्ध नाही,' असे आंदोलनकर्त्या सावित्री देवी यांनी सांगितले.

'आम्ही याआधी दामोहचे खासदार प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे ही मागणी केली होती. मात्र, त्यांनी यावर काहीही केले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी आनंद कोपरिया यांनी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.