महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही तर... आरोग्य मंत्रालयाचा इशारा - corona live news

देशभरात आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेले ११ हजार ७०६ नागरिक पूर्णता बरे झाले आहेत. तर मागील २४ तासांत १ हजार ७४ जण बरे झाले आहेत.

lav agarwal
लव अगरवाल

By

Published : May 4, 2020, 5:32 PM IST

नवी दिल्ली - 'नागरिकांना निर्बंधांपासून सूट देण्यात आली आहे. पण, जर सोशल डिस्टंसिंग पाळलं गेल नाही, तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालायचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी आज दिला आहे.

देशभरात आत्तापर्यंत ११ हजार ७०६ नागरिक पूर्णता बरे झाले आहेत. तर मागील २४ तासांत १ हजार ७४ जण बरे झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर २७. ५२ टक्के आहे. तर कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४२ हजार ५३३ झाल्याचेही लव अगरवाल यांनी सांगितले.

आंतरराज्य मालवाहतूक करताना काहीही अडचण येता कामा नये, याची संबधीत राज्याने काळजी घ्यावी. केंद्रीय गृहमंत्रालायच्या १९३० हेल्पलाईनवर किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या १०३३ या मदत क्रमांकावर ट्रकचालक किंवा वाहतूक करणारे तक्रार नोंदवू शकतात, असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पी. श्रीवास्तव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details