पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी या बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी स्वतःची घोषणा केली असून प्लूरल्स असे त्यांच्या आपल्या पक्षाचे नाव आहे. आज त्यांनी पक्षाचे उमेदवार सुधीर कुमार यांच्यासाठी सभेला संबोधीत केले.
पुष्पम प्रिया चौधरी उतरल्या मैदानात... मी नेता नाही, जर मी नेता असते. तर मी नेत्याची भाषा बोलले असते. मला बिहारचा विकास हवा आहे, राज्यात विकास हवा आहे. म्हणूनच आज मी इथे आले आहे. गेल्या 15 वर्षात राज्यातील नेत्यांनी केवळ आश्वासने दिली आहेत, परंतु ती आश्वासने पाळत नाहीत, असे त्या म्हणाल्या.
'मी बिहारला एक आदर्श मॉडेल बनवीन' मला धोरण तयार करण्यात रस आहे. राजकारण हा पॉलिसी करण्याशी संबंधित असतो. जर माझे सरकार स्थापन झाले. तर मी बिहारला एक आदर्श बनवीन. बिहारला पुढे नेण्याचा प्रयत्न हाच माझा संकल्प आहे, असेही त्या म्हणाल्या.
पुष्पम प्रिया यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' आणि पॉलिटिकलमधून 'मास्टर ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन'चे शिक्षण घेतले आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समधील आयडीएसमधून डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. तर, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. 2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता.