मुझफ्फरपूर - 'मी जर एखाद्याला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनवू शकतो, तर तुम्हाला आमदार-खासदारही बनवू शकतो,' असे जेडीयूचे (जनता दल युनायटेड) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी बिहारच्या तरुणांना सांगितले. 'मी तुम्हालाही सहजपणे आमदार-खासदार बनवू शकतो,' असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. किशोर यांनी २०१२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार मोहीम राबवली होती. तसेच, त्यांच्या संकल्पनेवरच आधारित प्रचार, जाहिरातबाजी, मंथन किंवा चाय पे चर्चा अशा 'मार्केटिंग स्ट्रॅटेजीज' २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींसाठी राबवल्या होत्या.
मी मुख्यमंत्री-पंतप्रधान बनवले, तुम्हालाही आमदार-खासदार बनवू शकतो - प्रशांत किशोर - cm
किशोर यांनी २०१२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार मोहीम राबवली होती. तसेच, त्यांच्या संकल्पनेवरच आधारित प्रचार, जाहिरातबाजी, मंथन किंवा चाय पे चर्चा अशा 'मार्केटिंग स्ट्रॅटेजीज' २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींसाठी राबवल्या होत्या.
किशोर यांनी २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नीतीश कुमार यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी २०१८ मध्ये औपचारिकरीत्या जेडीयूमध्ये प्रवेश केला. मात्र, नुकतेच त्यांचे पक्षाध्यक्ष नीतीश यांच्याशी मतभेद झाले आहेत. नीतीश कुमार यांच्या जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेससोबतच्या आघाडीतून २०१७मध्ये बाहेर पडण्याच्या आणि भाजपसोबत जाण्याच्या पद्धतीवरून हे मतभेद झाले आहेत.
किशोर यांनी राजकारणात तरुणांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. त्यांनी ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान राजकीय नेते, उद्योजकांसह १ हजार ६०० जणांचा जेडीयूमध्ये समावेश करून घेतला. 'त्यांनी जेडीयूच्या कार्यकर्त्यांची फळी भक्कम करण्यासाठी 'यूथ इन पॉलिटिक्स' हा कार्यक्रम राबवला. त्यांनी १ लाख तरुणांना निवडणुकीच्या राजकारणात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,' असे जेडीयूच्या प्रेस रीलीजमध्ये म्हटले आहे. पंचायत राज संस्थांमधील माजी सदस्य, महापौर, ब्लॉक प्रमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष, उद्योजक, विद्यार्थी, महिला आणि काही जणांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.