भोपाळ -सरकार जर पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व देत असेल, तर मग नागरिकत्व सुधारणा कायद्याची गरजच काय? असा प्रश्न काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. ते भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
आपण आधीच पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व देत आहोत, मग 'सीएए'ची गरज काय?
जर देशाचे सरकार पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व देऊ शकते, तर सीएए सारखा कायदा लागू करण्याची गरजच काय आहे? यावरून हेच लक्षात येते, की हा कायदा केवळ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी लागू करण्यात आला आहे, असे मत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले.
अदनान सामींना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणी केल्यामुळे माझ्यावर टीका करण्यात येत होती. मात्र आता त्यांना भारतीय नागरिकत्व आणि देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला 'पद्मश्री' पुरस्कारही मिळाला आहे. जर देशाचे सरकार पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व देऊ शकते, तर मग सीएए सारखा कायदा लागू करण्याची गरजच काय आहे? यावरून हेच लक्षात येते, की हा कायदा केवळ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी लागू करण्यात आला आहे, असे मत सिंह यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : ओडिशात माओवाद्यांना दगडाने ठेचले, एक ठार; प्रजासत्ताक दिन साजरा करू नये म्हणून केला होता गोळीबार