पाटणा -बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. नेत्यांकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर बोचरी टीका केली आहे. 'जर आम्ही सत्तेत आलो तर, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना 10 वीची परीक्षा पास करण्यासाठी मदत करू', अशी टीका संजय जैस्वाल यांनी केली.
मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना सायकल, पुस्तके, गणवेशाचे वाटप केले. मात्र, दोन मुख्यमंत्री ( लालू प्रसाद-राबडी देवी) त्यांच्या मुलांना 10 वी पास करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकले नाही. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना 10 वीची परीक्षा पास करण्यासाठी मदत करू, अशी टीका संजय जैस्वाल यांनी केली.