नवी दिल्ली :भारत-चीन सीमा प्रश्नावरून काँग्रेस पक्षाने भाजप सरकारला धारेवर धरले आहे. लडाखमधील चिनी अतिक्रमणावरून सोनिया गांधी यांनी पुन्हा मोदींवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. चीनपासून देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकार टाळू शकत नाही. मोदी सरकार केव्हा आणि कसा भारताची लडाखमधील भूमी चीनकडून माघारी घेणार आहे? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
लडाखमधील परिस्थितीवरून देशाला आत्मविश्वासात घेण्याची मागणी सोनिया गांधी यांनी सरकारकडे केली. लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ काँग्रेसने 'स्पीक अप फॉर आवर जवान' हे अभियान सुरु केले आहे. जर चीनने भारताची भूमी बळकावली नाही, तर आपले 20 जवान कसे शहीद झाले? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला केला.