नवी दिल्ली : जर कोणाला पक्ष सोडून जायचे असेल, तर ते जातील. त्यांच्या जाण्यामुळे तुमच्यासारख्या तरुणांना राजकारणात येण्यासाठी संधी उपलब्ध होते; असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सचिन पायलट यांची काँग्रेस सोडण्याची शक्यता अधिकच दाट झाली आहे.
'जर कोणाला पक्ष सोडायचा असेल, तर ते सोडतील..'; राहुल गांधींचे सूचक वक्तव्य.. - Rahul gandhi on sachin pilot
गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच, आधी ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेस सोडल्याने आणि सचिन पायलटही त्याच वाटेवर असल्याचे पाहून काँग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्व आणि घराणेशाहीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच राहुल गांधींनी अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच, आधी ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेस सोडल्याने आणि सचिन पायलटही त्याच वाटेवर असल्याचे पाहून काँग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्व आणि घराणेशाहीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
काँग्रेसमधील बंडखोरीचा विरोधकांनाच फायदा होताना दिसून येत आहे. आधी ज्योतिरादित्यांच्या जाण्याने काँग्रेसला मध्यप्रदेशातील सत्ता गमवावी लागली होती. त्यातच आता पायलट यांच्या नाराजीनाट्यामुळे राजस्थानमध्येही राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.