'पंतप्रधान मोदी आता हल्लेखोराला कपड्यांवरून ओळखा' - @asadowaisi
एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
ओवेसी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
नवी दिल्ली -जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. त्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या तरुणाला त्यांच्या कपड्यावरून ओळखा', असे ओवेसींनी टि्वट करून म्हटले आहे.