नवी दिल्ली- 'माझ्याविरोधातील खटला मी शेवटपर्यंत लढेन, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांनी दिली आहे. जो कोणी सत्य बोलतो त्याला अपमानजनक बोलला म्हणून शिक्षा होते. अनेकांना याचा सामना करावा लागलेला आहे. इतकेच काय खरे बोलले म्हणून महात्मा गांधींची सुद्धा या देशात हत्या झाली होती. मी सर्वकाही सहन करायला तयार आहे. सत्य बोलल्यामुळे तुरुगांत राहून माझ्या मृत्यू झाला तरी चालेल मात्र मी सत्याची कास सोडणार नाही, अशा शब्दांत राणा यांनी स्पष्टिकरण दिले आहे. फ्रान्समधील हत्येप्रकरणी राणा यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुनव्वर यांच्याविरोधात गुन्हा -
प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे गुन्हा दाखल झाला आहे. फ्रान्समधील हत्येप्रकरणी राणा यांनी वक्तव्य केले होते. यानंतर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. पोलीस दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुनव्वर यांच्या वक्तव्याने सामाजिक सौहार्द बिघडले असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.