हेग -भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने लागला आहे. न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालाने कुलभूषण यांना मोठा दिलासा दिला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांनी कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात 16 न्यायाधीश आहेत. 16 न्यायाधीशांपैकी 15 न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. आयसीजेमध्ये भारताच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती.
फाशीला स्थगिती
कुलभूषण यांच्या अटकेची माहिती भारताला न दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला खडसावले. पाकिस्तानच्या फाशीच्या निर्णयावर पूर्ण विचार होणार असून भारताला कॉन्सीलर अॅक्सीस देण्यात आला आहे. जोपर्यंत या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायाधिशांनी दिला आहे. याचबरोबर पाकिस्तानने व्हिएन्ना करारातील अटींचे उल्लंघन केल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे. कुलभूषण यांना कायदेशीर मदत आणि त्यांचे राजनैतिक अधिकार कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पाकिस्तानला दिले आहेत.
भारतात जल्लोषाचे वातावरण
- जाधव यांना न्याय मिळेल. प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षे आणि कल्याणासाठी सरकार काम करत राहणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन म्हटले आहे.
- अमित शाह यांनी हा विजय सत्या आणि मानवतेचा झाला आहे, असे म्हटले आहे.
-
सुषमा स्वराज यांनी हरीष साळवे यांचे आभार मानले आहेत.
-
भारताच्या बाजुने निकाल लागल्यामुळे कुलभूषण यांच्या मित्रांनी आनंद साजरा केला आहे.
-
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या कॉन्सीलर अॅक्सीसचे स्वागत आहे. भारताचा हा विजय ऐतिहासीक आहे, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
- हेग येथील न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
-
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
-
लंडनमध्ये हरीष साळवे यांनी पाकिस्तानने जर कुलभूषण यांनी निपक्ष सुनावणी देण्यात अपयशी ठरले तर आम्ही पुन्हा ICJ मध्ये जाऊ, असे लंडनमध्ये माध्यमांशी बोलताना हरीष साळवे म्हणाले आहेत.