हैदराबाद :प्रतिष्ठित असा समजला जाणारा, 'आयबीसी इनोव्हेशन अवॉर्ड २०१९' हा 'ईटीव्ही भारत'ने पटकावला आहे. 'कंटेंट एव्हरीव्हेअर' या श्रेणीमध्ये ईटीव्ही भारतला पुरस्कार मिळाला. अॅमस्टरडॅममध्ये झालेल्या एका प्रसारण अधिवेशनामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग कन्व्हेंशन (आयबीसी) हा लंडनमधील मीडिया, एंटरटेन्मेंट आणि टेक्नॉलॉजी संबंधी कार्यक्रम आहे.
प्रतिष्ठित अशा 'आयबीसी' पुरस्कारावर 'ईटीव्ही भारत'ची मोहर! 'ईटीव्ही भारत' हे भारतातील प्रमुख १२ भाषांमध्ये बातम्या पोहोचवते. ज्यामध्ये हिंदी, उर्दू, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी, असामी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आहे. डिजिटल न्यूज रूममध्ये क्रांती आणल्याबद्दल ईटीव्ही भारतचा विशेष उल्लेख केला आहे.
व्यापक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि देशभरात पसरलेल्या जवळपास ५,००० मोबाईल पत्रकारांच्या मदतीने ईटीव्ही भारत हे दुर्लक्षित आणि दुर्गम भागातील बातमीकडेदेखील गुणवत्तापूर्वक लक्ष देते.
ईटीव्ही भारत 'न्यूज टाईम' हे सदर चालवते. यामध्ये दर पाच मिनिटांनी एक 'लाईव्ह बुलेटिन' सादर केले जाते. ज्यात ताज्या घडामोडी संक्षिप्त आणि वेगवान पद्धतीने सादर केल्या जातात. यामध्ये राजकीय, सामाजिक, शेतीविषयक, शिक्षण, आरोग्य, खेळ, व्यापार आणि मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश असतो.
यासोबतच ईटीव्ही भारत हे विविध तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांशी चांगल्या प्रकारे संलग्न आहे. ज्यामध्ये, अवेको, शरण्यू टेक्नॉलॉजीस, रोबोसॉफ्ट टेक्नॉलॉजीस, हार्मोनिक्स अशा विविध कंपन्यांचा समावेश आहे.
ईटीव्ही भारत हे मोबाइल फोन आणि टॅब्लेटद्वारे दर्शकांच्या मागणीवर आधारित कंटेंट पुरवण्याची सुविधा देते.
२१ मार्च २०१९ रोजी सुरु झालेले, 'रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद' स्थित, विशेष असे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
सर्वाधिक खप असलेले तेलुगु दैनिक - ईनाडू आणि सात तेलुगु चॅनल्स असलेले ईनाडू टेलिव्हिजन यांची मालकी असलेले 'रामोजी ग्रुप' हे भारतातील सर्वात विश्वासू असे मीडिया हाऊस आहे. जे आपल्या सत्यतेसाठी आणि निःपक्षपातीपणासाठी प्रसिद्ध आहे.