मेरठ (उ.प्र)- निर्भया अत्याचारा प्रकरणी नवी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने चारही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यानुसार २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फाशी दिली जाणार आहे. दरम्यान आरोपींना फासावर लटकवण्यासाठी पवन जल्लाद यांनी तयारी दर्शविली आहे. आपण या कार्यासाठी तयारी देखील केली होती, असे पवन जल्लाद यांनी सांगितले आहे.
पवन जल्लाद म्हणतो.. निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकविताना मला आनंद होईल - merat
आरोपींना फासावर लटकविण्यासाठी आपण तयार आहे. हे काम करताना मला आनंद होईल, असे जल्लाद पवन यांनी सांगितले.
पवन जल्लाद
आरोपींना फासावर लटकवण्यासाठी आपणास निमंत्रण आले तरी मी तातडीने जाईल असे पवन जल्लाद यांनी सांगितले आहे. या कार्यासाठी आपण याआधी देखील तयारी केली होती. मात्र, काही कारणास्तव तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी मला फक्त तयार राहण्यास सांगितले होते. मात्र, आता आरोपींना फासावर लटकविण्यासाठी आपण तयार आहे. हे काम करताना मला आनंद होईल, असे जल्लाद पवन यांनी सांगितले.
हेही वाचा-BREAKING... निर्भयाला ७ वर्षानंतर न्याय ! दोषींना फाशीची तारीख ठरली