महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हवाई दलाने लाँच केला अॅक्शन गेम, असा करा व्हिडिओ गेम डाऊनलोड - IAF

देशातील तरुणांना भारतीय वायू दलाची माहिती आणि लष्करात येण्याची प्रेरणा देण्यासाठी भारतीय हवाई दलाने आज एक व्हिडिओ गेम लॉच केला आहे.

अॅक्शन गेम

By

Published : Jul 31, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली - देशातील तरुणांना भारतीय वायू दलाची माहिती आणि लष्करात येण्याची प्रेरणा देण्यासाठी भारतीय हवाई दलाने आज एक व्हिडिओ गेम लॉच केला आहे. 'Indian Air Force: A Cut Above' असे या गेमचे नाव आहे.


भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या हस्ते हा गेम लॉच करण्यात आला आहे. हा गेम Android आणि iOS या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर खेळता येतो. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर हवाई दलाने गेल्या आठवड्यात 20 तारखेला टीझर जारी करत या व्हिडिओ गेमची माहिती दिली होती.


हा गेम एका वेळी एकच व्यक्ती खेळू शकतो. मात्र लवकरच हा गेम एकाच वेळी अनेक जण खेळू शकतील असा मल्टीप्लेअर मोड जोडला जाणार आहे. यामध्ये युजर पायलट होईल. त्याच्याकडे विमानाचे सर्व सर्व कंट्रोल असतील. युजरला मिग-21 पासून सुखोई, मिराज, एमआय-17 सारखी लढाऊ विमाने उडवता येतील.


https://play.google.com/store/apps/details?id=com.threye.iaf.aca येथून हा व्हिडीओ गेम डाऊनलोड करता येईल.


या गेममध्ये सुरवातीला युजरला ट्रेंनिग दिली जाईल. त्यानंतर युजरला गेम खेळता येईल. या गेमच्या माध्यमातून वायू दलाची कामगीरी अनुभवता येणार आहे. तर यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांचे पात्र आणि बालाकोट स्ट्राईक देखील पाहायला मिळणार आहे. याचबरोबर जो गेममधील सर्व टप्पे पार करेल त्याला वायू दलाकडून खास भेट देण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details