नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेच्या 'चीता' हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील बागपतच्या एक्सप्रेस पेरिफेरल रोडवर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
जेव्हा वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची लँडिंग थेट एक्सप्रेसवेवर होते..... - IAF
कोरोनासंदर्भातील कामासाठी संबंधित हेलिकॉप्टर गाजियाबाद येथील हिंडन येथून चंदिगड येथे जात होते. हिंडन येथून जवळपास साडेपाच किलोमीटर उंच गेल्यावर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे.
जेव्हा वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची लँडिंग थेट एक्सप्रेसवेवर होते.....
कोरोनासंदर्भातील कामासाठी संबंधित हेलिकॉप्टर गाजियाबाद येथील हिंडन येथून चंदिगड येथे जात होते. हिंडन येथून जवळपास साडेपाच किलोमीटर उंच गेल्यावर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. यानंतर प्रसंगावाधन राखत वैमानिकाने हेलिकॉप्टरचा तत्काळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.
आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे हेलिकॉप्टरचे नुकसान झाले नाही. हेलिकॉप्टरमध्ये आलेला बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुरक्षितरित्या हेलिकॉप्टर हिंडन एअरबेसवर परतले.