महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'नोटबंदीच्या काळात ६२५ टन नोटा आम्ही भारतभर पोहचवल्या' - माजी नौदल प्रमुख बी. एस धनोवा बातमी

देशभरामध्ये नव्या नोटा पोहचवण्यासाठी ३३ मिशन हवाई दलाने राबवले. याद्वारे देशभरातील विविध ठिकाणी पैसे पोहचवण्यात आले. तसेच अभिनंदन वर्धमान मिग- २१ ऐवजी राफेल विमान चालवत असते तर निकाल काहीतरी वेगळाच लागला असता.

बी. एस धनोवा
बी. एस धनोवा(संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 5, 2020, 2:05 PM IST

मुंबई - '२०१६ साली देशामध्ये नोटबंदी झाली तेव्हा भारतीय हवाई दलाने देशाच्या विविध भागात ६२५ टन नोटा पुरवल्या. जर २० किलोच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसतात, तर आम्ही नक्की किती पैसे देशभर पुरवले, आम्हालाही माहीत नाही', असे माजी नौदल प्रमुख बी. एस धनोवा यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

८ नोव्हेंबरला देशात पंतप्रधान मोदींनी नोटबंदी केली. त्यावेळी ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर देशभरामध्ये नव्या नोटा पोहचवण्यासाठी ३३ मिशन हवाई दलाने राबवले. याद्वारे देशभरातील विविध ठिकाणी पैसे पोहचवण्यात आले, अशी माहिती धनोवा यांनी दिली. ते मुंबईतील इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या 'टेकफेस्ट' या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना धनोवा यांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईक नंतर झालेल्या घडामोडींवरही मत व्यक्त केले. जर अभिनंदन वर्धमान मिग- २१ ऐवजी राफेल विमान चालवत असते तर निकाल काहीतरी वेगळाच लागला असता. शस्त्रास्त्र खरेदी वादावरूनही त्यांनी मत व्यक्त केले. अशा वादांमुळे शस्त्रखरेदीमध्ये दिरंगाई होऊन देशाच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम होतो, असे ते म्हणाले. राजीव गांधीच्या काळात बोफोर्स तोफा खरेदी प्रक्रियेवरही आरोप झाले. मात्र, या तोफा भारतासाठी चांगल्या असल्याचे सिद्ध झाले आहे, असे धनोवा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details