महाराष्ट्र

maharashtra

अचूक वेध..! हवाई दलाकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By

Published : Oct 30, 2020, 10:43 PM IST

Updated : Oct 31, 2020, 6:12 AM IST

भारतीय हवाई दलाने आज (शुक्रवार) ब्राम्होस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने दुपारी दीडच्या दरम्यान समुद्रातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या क्रूझ क्षेपणस्त्राची ही दुसरी चाचणी होती.

BrahMos
सुखोई संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने आज (शुक्रवार) ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेल्या या क्रूझ क्षेपणास्त्राची सुखोई-३० लढाऊ विमानाद्वारे चाचणी घेण्यात आली. बंगालच्या उपसागरात क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

हवेतून डागता येणार

सुखोई-३० लढाऊ विमानाने पंजाबमधील ९ वाजता हलवाडा हवाई तळावरून उड्डान भरले. हवेत इंधन भरल्यानंतर विमान बंगालच्या उपसागरात पोहचले. बंगालच्या उपसागरात क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राने दुपारी दीडच्या दरम्यान समुद्रातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या क्रूझ क्षेपणस्त्राची ही दुसरी चाचणी होती.

पहिली चाचणी

१८ ऑक्टोबरला नौदलाच्या स्टेल्थ डिस्ट्रॉयरचा वापर करुन ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. या चाचणीवेळी ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य यशस्वीरीत्या भेदले होते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाद्वारे एकत्रित विकसित केले आहे.

Last Updated : Oct 31, 2020, 6:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details