नवी दिल्ली -जगावर कोरोनाचे संकट असताना फ्रान्स भारताला वेळेत राफेल विमानांचा पुरवठा करत आहे. बुधवारी म्हणजे आज पाच राफेल लढाऊ विमाने अंबाला भारतीय हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. मात्र, अंबाला येथे हवामान खराब होत आहे. अशा परिस्थितीत भारतीय वायुसेनेने राफेल विमानांच्या लँडिंगसाठी दुसरा पर्याय म्हणून जोधपूर विमानतळही सज्ज केले आहे.
सध्या अंबाला येथील हवामान इतर परिस्थिती सामान्य आहे. मात्र, वेळेवर जर अंबाला येथील हवामानात खराबी झाली. तर अडचण निर्माण होईल. म्हणून जोधपूर विमानतळही लँडिंगसाठी सज्ज करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन लढाऊ विमानांच्या स्वागताची तयारी जोधपूर विमानतळावरही करण्यात आली आहे.