बीकानेर - भारत-पाकिस्तान सीमेजवळ शोभासर परिसरात भारताचे मिग-२१ विमान कोसळले. या अपघातात विमानातून वेळीच उडी मारल्याने वैमानिक सुरक्षित राहिला. रुटिन उड्डाणावेळी हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भारत-पाक सीमेजवळ मिग-२१ कोसळले, वैमानिक सुरक्षित
'कोर्ट ऑफ एन्क्वायरी' अपघाताची चौकशी केली जाणार आहे. विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 'कोर्ट ऑफ एन्क्वायरी' याची चौकशी केली जाणार आहे. विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
एका आठवड्यापूर्वी पाकिस्तानी जेट विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसल्यानंतर भारतीय हवाई सेनेच्या विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. दरम्यान, पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला भारताचे मिग-२१ बायसन पाडले होते. यानंतर या विमानातून पॅराशूटसह उडी बाहेर उडी घेतलेले वैमानिक अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानी हद्दीत पोहोचले होते. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान पाडले होते. १ मार्चला अभिनंदन यांना पाकिस्तानने भारताकडे परत पाठवले होते.