महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय एअर फोर्सने हवाई वाहतूक निर्बंध उठवले; पाककडून मात्र कायम - airspace restriction

एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी बालाकोट येथे हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांकडून हवाई वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले होते.

भारतीय एअर फोर्सने हवाई वाहतूक निर्बंध उठवले; पाककडून मात्र कायम

By

Published : Jun 1, 2019, 9:08 AM IST

नवी दिल्ली - भारतीय हवाईदलाकडून सर्व हवाई मार्गावरील वाहतूक निर्बंध उठवण्यात आले आहे, अशी माहिती एअर फोर्सकडून देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी २०१९ ला सर्व हवाई वाहतूक मार्गावर लावलेले निर्बंध उठवण्यात आले आहे, अशा प्रकारचे ट्विट भारतीय हवाई दलाने करत ही माहिती दिली आहे.


१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारताने अवघ्या १२ दिवसांमध्ये पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हा हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांकडून हवाई वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले होते. ते निर्बंध भारतीय हवाई दलाकडून उठवण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने १४ जुनपर्यंत हे निर्बंध वाढवले आहे. त्यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाता येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details