महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय हवाई दल दिन : तीनही दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली...

भारतीय हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने भारतीय सेनेच्या तीनही दलाच्या प्रमुखांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

#IAFDay

By

Published : Oct 8, 2019, 8:22 AM IST

नवी दिल्ली - आठ ऑगस्ट रोजी भारतीय हवाई दल दिन साजरा केला जातो. हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिन. त्यानिमित्ताने, आज भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत, भारतीय वायुसेना प्रमुख आर.के.एस. भदौरिया आणि नौदल प्रमुख, अ‌ॅडमिरल करमबीर सिंग यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात त्यांनी आज सकाळी श्रद्धांजली वाहिली.

भारतीय हवाई दल हे जगातील चौथे सर्वात मोठे, तर सातवे सर्वात शक्तीशाली हवाई दल आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी आपल्या 'राहत' मिशनमध्ये तब्बल २०,००० लोकांना एअरलिफ्ट करत भारतीय हवाई दलाने एक विश्वविक्रम केला होता. नुकतेच भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केल्या दावा करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details