काश्मीर- भारताचे वीर सुपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी जम्मू-काश्मीर येथे भारतीय हवाई दलाच्या सहकाऱयांबरोबर संवाद साधला. यावेळी हवाई दलाच्या युनिटने अभिनंदन यांच्या नावाचा जयघोष केला, तसेच काही जवानांनी त्यांच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रे देखील घेतले.
हवाई दलाच्या जवानांची विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड - Raigad
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी जम्मू-काश्मीर येथे भारतीय हवाई दलाच्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी हवाई दलाच्या काही जवानांनी त्यांच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रे देखील घेतले.

हवाई दलाच्या जवानांची विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली.
हवाई दलाच्या जवानांची विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली.
भारताच्या वायूसेनेने २६ फेब्रुवारीला पाकव्याप्त बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी २७ फेब्रुवारीला भारताच्या वायू सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देताना भारताचे मिग-२१ हे विमान अपघातग्रस्त होऊन पाकिस्तानच्या सीमेत कोसळले. या घटनेत विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले होते. भारताच्या दबावानंतर केवळ दोन दिवसांत पाकिस्तानकडून वर्धमान यांची सुटका करण्यात आली होती.
Last Updated : May 5, 2019, 2:01 PM IST