महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपचा आमदार म्हणतोय...होय आम्ही जनतेचे विश्वासू श्वान आहोत - Madhya Pradesh minister

होय आम्ही जनतेचा आवाज उठवणारे श्वान आहोत, असे भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी म्हटले आहे.

रामेश्वर शर्मा

By

Published : Jul 15, 2019, 8:35 PM IST

नवी दिल्ली - मध्य प्रदेश मंत्री सज्जन सिंह यांच्यानुसार जर आम्ही श्वान आहोत. तर होय आम्ही जनतेचा आवाज उठवणारे श्वान आहोत, असे भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी म्हटले आहे.


सज्जन सिंह यांनी भाजप आमदारांना श्वान असे संबोधले होते. त्यावर भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी स्वतःलाच 'होय आम्ही श्वान आहोत', अशी प्रतिक्रिया दिली आहे. मला सज्जन सिंह यांना सांगायला आवडेल की आम्ही जनतेचे विश्वासू श्वान आहोत. त्यांच्या समस्या आणि भल्यासाठी आम्ही असाच आवाज उठवणार आहोत, असे रामेश्वर यांनी म्हटले आहे.


कमलनाथ सरकारने राज्यातील 46 पोलीस डॉग हँडलर्सना त्यांच्या श्वानांसह बदली करण्याचा आदेश दिला होता. या आदेशावर 'कमलनाथ सरकारने तर श्वानांना पण नाही सोडले त्यांची सुद्धा बदली केली. बदली करण्याच्या व्यतीरिक्त सरकारला विकासाची कामे करता येतात का?', अशी टीका भाजपने केली होती. या टीकेवर ' त्यांची (भाजपची) मानसीकताच श्वानासारखी आहे. त्याला कोण काय करणार', असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशमधील मंत्री सज्जन सिंह यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details