महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेत सोनियांच्या बाजूला बसून मुलायमसिंह म्हणाले, मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावे - INDIAN PRIME MINISTER

लोकसभेत चक्क सोनिया गांधींच्या बाजूला बसून मुलायम सिंह यांनी मोदींची स्तुती केली. मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, असे मुलायम सिंह यांनी म्हटले आहे.

By

Published : Feb 13, 2019, 5:35 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने युती केली आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली होती. अशातच समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज लोकसभेत चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे.

नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान होताना पाहायचे आहे, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार मुलायमसिंग यादव यांनी केले आहे. सर्व खासदार पुन्हा एकदा निवडून यावेत, अशी आपली इच्छा असल्याचेही मुलायम सिंग यांनी सांगितले. आज १६व्या लोकसभा बैठकीचा शेवटचा दिवस आहे. मुलायम सिंग यांनी लोकसभेत बोलताना हे वक्तव्य केले आहे.

गेल्या ३१ जानेवारीपासून सुरू झालेले अर्थसंकल्प सत्र आज संपणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचे मुलायम सिंह म्हणाले. राफेलसह अन्य मुद्द्यांवर भाजपशासित केंद्र सरकारवर समाजवादी पक्ष टीका करत असतानाच मुलायम सिंहांच्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुलायम सिंहांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत उपस्थित पंतप्रधान मोदींनी स्मित करून हात जोडत मुलायमसिंहांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details