महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IMA घोटाळ्यातील आरोपी म्हणतो...भारत सोडून मोठी चूक केली , २४ तासात परतणार - accused

आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’ (आयएमए) ह्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मोहम्मद मन्सूर खान भारतात येण्यास तयार झाला आहे.

मोहम्मद मन्सूर खान

By

Published : Jul 15, 2019, 9:52 PM IST

नवी दिल्ली - आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’ (आयएमए) ह्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मोहम्मद मन्सूर खान भारतात येण्यास तयार झाला आहे. येत्या 24 तासाच्या आत भारतात परतणार असल्याचे त्याने एक व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


'मी देश सोडून मोठी चूक केली. मात्र त्यावेळची परिस्थिती तशी होती की देश सोडून जाव लागलं. मी येत्या 24 तासाच्या आत भारतात परतणार आहे. भारतातील न्यायालयीन व्यवस्थेवर माझा पुर्ण विश्वास आहे. देश सोडल्यानंतर मला माहित नाही की माझे कुटुंब कोठे राहते. त्यांनी कशा प्रकरे जीवन व्यतीत केले असेल', असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


देशातील २३ हजारांहून जास्त लोकांची फसवणूक करुन मोहम्मदने भारतातून पळ काढला होता. बंगळुरुमध्ये मोठे रिटर्न्स मिळवून देतो असे सांगत त्याने हजारो लोकांना गंडा घातला होता. बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. मात्र त्यापुर्वी त्याने भारत सोडून पळ काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details