नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तरप्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे. उत्तर प्रदेशमधील दौऱ्यादरम्यान सुरक्षेचा ताफा कमी करावा, अशी विनंती आपल्या पत्रामधून प्रियंका गांधी यांनी आदित्यनाथ यांना केली आहे.
प्रियंका गांधींचे योगी आदित्यनाथांना पत्र, म्हणाल्या... - security
उत्तर प्रदेशमधील दौऱ्यादरम्यान सुरक्षेचा ताफा कमी करावा, अशी विनंती आपल्या पत्रामधून प्रियंका गांधी यांनी आदित्यनाथ यांना केली आहे.
'प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे. सोनिया गांधी या रायबरेलीला आल्या होत्या त्या वेळी त्यांच्यासोबत 22 गाड्यांचा ताफा होता. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला होता. इतर राज्यामध्ये मात्र दौऱ्याच्यावेळी फक्त एकच गाडी असते. त्यामुळे लोकांना त्रास होत नाही. माझ्या उत्तर प्रदेशमधील दौऱ्यादरम्यान सुरक्षेचा ताफा कमी करावा', अशी विनंती प्रियंका गांधी यांनी पत्राद्वारे आदित्यनाथ यांना केली आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी ह्या टि्वटरच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लोबोल करत असतात.