महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिंदीची सक्ती करावी असे म्हणलोच नव्हतो, अमित शाहांची कोलांटउडी - राष्ट्रभाषा

'एक देश-एक भाषा'ची घोषणा करत, देशाला एका भाषेची गरज आहे, असे म्हणणाऱ्या अमित शाह यांनी आता कोलांटउडी घेत, आपण हिंदीची सक्ती करावी असे म्हणलो नव्हतो असे स्पष्ट केले आहे. कोणाला या मुद्याचे राजकारण करायचे असल्यास, तो त्यांचा प्रश्न आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Amit Shah

By

Published : Sep 18, 2019, 8:26 PM IST

नवी दिल्ली - मी कधीही प्रादेशिक भाषांऐवजी हिंदीची सक्ती करा असे म्हणालो नव्हतो. फक्त आपल्या मातृभाषेनंतर दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकली पाहिजे असे म्हणालो होतो. असे अमित शाह यांनी आज स्पष्ट केले.

मी ज्या राज्यातून आलो, त्या गुजरातची भाषा देखील हिंदी नाही. त्यामुळे मी हिंदीची सक्ती करण्याविषयी बोलू शकत नाही. तरीही, कोणाला या मुद्याचे राजकारण करायचे असल्यास, तो त्यांचा प्रश्न आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले. यावर्षीच्या हिंदी दिनानिमित्त, गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले होते. देशाला एका भाषेची गरज आहे, जेणेकरून परेदशी भाषांना भारतामध्ये स्थान मिळणार नाही. असे अमित शाह एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते. यावेळी त्यांनी 'एक देश-एक भाषा' असा नारा दिला होता. मात्र, यामुळे शाह यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. बऱ्याच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि कलाकारांनी 'एक देश- एक भाषा'ला चांगलाच विरोध दर्शविला. भारताच्या विविधतेतील एकतेमध्ये भारताचे सौंदर्य आहे. या विविधतेचा एक अंग म्हणजेच या भाषा आहेत. असे म्हणत लोकांनी 'एक देश-एक भाषा' या धोरणावर चांगलीच टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details