कटनी - मध्य प्रदेशातील कटनी येथे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी उमा भारती यांची तुलना केली असता त्यांनी साध्वी प्रज्ञा एक 'महान संत' असल्याचे सांगितले. त्यांच्यासमोर आपण एक मूढ प्राणी आहोत, असे भारती यांनी म्हटले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी भोपाळ येथून बाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
साध्वी प्रज्ञा महान संत, मी एक सर्वसाधारण मूढ प्राणी - उमा भारती - creature
नुकतेच, उमा भारती यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद स्वीकारले आहे. उमा भारती स्वतःही साध्वी आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी राजकारणात नुकताच प्रवेश केला आहे. साध्वी प्रज्ञा या सध्या हिंदुत्ववाद्यांचा चेहरा मानल्या जात आहेत.
नुकतेच, उमा भारती यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद स्वीकारले आहे. तसेच, त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले आहे. उमा भारती स्वतःही साध्वी आहेत. तसेच, त्या भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी राजकारणात नुकताच प्रवेश केला आहे. साध्वी प्रज्ञा या सध्या हिंदुत्ववाद्यांचा चेहरा मानल्या जात आहेत. त्यांच्याविरोधात भोपाळमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह लढणार आहेत. भोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे. तर, २३ मे रोजी निकाल हाती येतील.