महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आठवलेंनी सुचवला नवा फॉर्म्युला; भाजपला मान्य असल्यास शिवसेनाही तयार - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या पर्यायास अनुकूलता दर्शवली आहे. भाजप या पर्यायासाठी तयार असल्यास शिवसेना याबाबत विचार करेल असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मी याबाबत भाजपसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Ramdas Athavle about Shivsena-BJP

By

Published : Nov 18, 2019, 6:35 PM IST

Updated : Nov 18, 2019, 7:33 PM IST

नवी दिल्ली - शिवसेना मंत्री संजय राऊत यांच्यासोबत मी चर्चा केली आहे. मी त्यांना ३-२ असा फॉर्म्युला सुचवला आहे. तीन वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असा हा फॉर्म्युला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या पर्यायास अनुकूलता दर्शवली आहे. भाजप या पर्यायासाठी तयार असल्यास शिवसेना याबाबत विचार करेल असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मी याबाबत भाजपसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज दिल्लीमध्ये सरकार कसे स्थापन करायचे याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारण्याऐवजी शिवसेना-भाजपला विचारा, असे वक्तव्य केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा : शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर

Last Updated : Nov 18, 2019, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details