नवी दिल्ली- मंत्रीपद देण्यासंबंधी नरेंद्र मोदी माझ्या नावाचा नक्कीच विचार करतील, असा मला विश्वास असल्याचे आरपीआय अध्यक्ष तथा माजी सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मी मोदींच्या फोनबद्दल आशावादी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर, आज मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपतीभवनात आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी इतर मंत्रीपदांसाठीही शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी मंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नसून मंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याची शक्यता आहे.
मला आशा आहे, मंत्रीपदासाठी मोदी मला नक्की फोन करतील - रामदास आठवले
अद्याप मंत्रपदाची यादी घोषीत झाली नसली तरी आठवलेंच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता दिल्लीतील सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, आठवले यांना अद्याप यासंदर्भात कळविण्यात अलेले नसल्याचे समजते.
आपल्याला मंत्रीमंडळात सामील करण्याबाबतचा प्रस्ताव अद्यापही आलेला नाही. मात्र, मोदी मंत्रीपदासाठी माझ्या नावाचा नक्कीच विचार करतील. मी त्यांच्या फोनची वाट पाहत असून आज त्यांचा फोन येईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल आणि अरविंद सावंत यांच्यासोबत मलाही केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळेल, असेही आठवले म्हणाले. अद्याप मंत्रपदाची यादी घोषीत झाली नसली तरी आठवलेंच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता दिल्लीतील सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, आठवले यांना अद्याप यासंदर्भात कळविण्यात अलेले नसल्याचे समजते.