बंगळुरू- राजकारणात मी चुकून आलो होतो. मात्र, आता मी राजकारणातून संन्यास घेण्याच्या विचारामध्ये असल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज म्हटले आहे.
कर'नाटक'चा अंक दुसरा : चुकून मुख्यमंत्री झालो होतो, राजकारणातून संन्यास घेणार - कुमारस्वामी - काँग्रेस-जेडी(एस)
राजकारणात मी चुकून आलो होतो. मात्र, आता मी राजकारणातून संन्यास घेण्याच्या विचारामध्ये असल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज म्हटले आहे.
'मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करत आहे. राजकारणात मी चुकून आलो होतो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. 14 महिने मी राज्याच्या विकासासाठी चांगले काम केले असून मी समाधानी आहे. सध्याची राजकीय परिस्थिती ही लोकांसाठी चांगली नाहीये. माझ्या कुटुंबाला यामध्ये आणू नका. मला शांततेत जगू द्या. मी सत्तेत असताना चांगले केले असून मला लोकांच्या हृदयात जागा हवी आहे', अश्या भावना कुमारस्वामी यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस-जेडी(एस)च्या आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून पक्षाशी द्रोह केला होता. त्यामुळे काँग्रेस-जेडी(एस)चे सरकार बहुमत चाचणीत फेल झाले. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळ्यानंतर येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.