अमरावती -आंध्र प्रदेशमधील सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात असे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुचवले होते. त्यावर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
'जगाशी स्पर्धा करायची असेल, तर आंध्रातील सरकारी शाळा इंग्रजी माध्यमात हव्या' - जगनमोहन रेड्डी इंग्रजी सक्ती
आंध्र प्रदेशमधील सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात या कल्पनेवर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याबाबत बोलताना जगनमोहन रेड्डी म्हणाले, की आज आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. इंग्रजीशिवाय या स्पर्धेत उतरणे केवळ अशक्य आहे. त्यासाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

CM Jagan Mohan Reddy about English Medium