भोपाळ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर शहरातील चिरायू रुग्णालयात उपचार सुुरु आहेत. आज(रविवार) त्यांनी ट्विटवरून त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती दिली. ‘मी ठीक असून राज्यातील कोरोना वॉरिअर्सला सलाम’, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शिवराज सिंह चौहान यांना काल (शनिवार) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आज त्यांनी नागरिकांना ट्विटरद्वारे प्रकृतीची माहिती दिली. तसेच कोरोना व़ॉरिअर्सचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. 'मित्रांनो मी ठीक असून कोरोना योद्ध्यांचे कामाप्रती समर्पण प्रशंसनीय आहे. कोरोना बाधितांचे उपचार करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना माझा सलाम. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते निस्वार्थीपणे रुग्णांची सेवा करत आहेत, असे ट्विट चौहान यांनी केले.