सोलन -जगभरात कोरोना विषाणूने थैमान पसरवले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नावाच्या औषधावर सध्या जगाचे लक्ष आहे. हे औषध मलेरिया रोगापासून वाचण्यासाठी उपयोगी आहे. मात्र, आता देश विदेशात या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी महत्वपूर्ण असलेले हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या उत्पादनासाठी कच्चा माल तयार करण्यात येत आहे. त्याचमुळे प्रदेशातील मोठे औद्योगिक क्षेत्र बीबीएनसह इतर औद्योगिक क्षेत्रातील तबब्ल ३८ उद्योगांमध्ये याचे उत्पादन सुरू झाले नाही. सद्य परिस्थितीत जिथे या औषधासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध आहे, अशा जवळपास १० उद्योगक्षेत्रात या औषधाचे उत्पादन सुरू झाले आहे.
हिमाचल प्रदेशच्या ५० उद्योजकांजवळ औषधी तयार करण्याचे लायसंस -
डिफ्टी ड्रग कंट्रोलर हिमाचल प्रदेशचे मनीष कपूर यांनी याबाबत सांगितले, की हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची औषधी तयार करण्यासाठी जवळपास ५० उद्योजकांजवळ औषधी तयार करण्याचे लायसंस आहे. तर, सोलन जिल्ह्यातील बीबीएन क्षेत्रातील जवळपास २३ उद्योग असे आहेत, जिथे या औषधीवर काम करणे सुरू झाले आहे. एका उद्योजक कंपनीमध्ये दरदिवशी २ लाख ते २ कोटी औषधी गोळ्या तयार करण्याची क्षमता आहे.
भारतात या औषधीचे उत्पादन वाढवण्यासाठई केंद्र सरकराने प्रदेश सरकाला बीबीएनमध्ये स्थापीत असलेले जिड्स कॅडिला, सिपला, टोरेंट फार्मा आणि डॉ. रेड्डी लॅब यांना लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या अढथळ्यांना दूर करून काम करण्याचे आदेश दिले होते. हेच कारण आहे, की जिल्हा प्रशासनाने यासोबतच इतर फार्मा कंपन्यांना दुसऱ्या राज्यातील किंवा जिल्हातील कर्मचाऱ्यांना एकवेळ काम करण्याची परवानगी दिली आहे. जवळपास १० उद्योजक कंपन्यांना ही परवानगी मिळाली आहे. यामधून हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची औषधी मोठ्या प्रमाणात तयार होईल, अशी आशा आहे.