हैदराबाद- संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूला लढा देण्यात जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपले प्राण पणाला लावत आहेत. यातच हैदराबादचे एक कुटुंबही सामील आहे. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व लोक डॉक्टर आहेत. सध्या ते सर्व कोरोनाशी लढा देण्यात सहभागी आहेत.
शहरातील छातीच्या दवाखान्याचे अधीक्षक असलेले डॉ. महबूब खान हे श्वसानासंबंधी आजाराचे विशेषज्ञ आहेत. सध्या ते रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. इंडोनेशियामधील नऊ नागरिकांवर याबाबत उपचार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.