महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हैदराबादच्या काचीगुडा स्थानकाजवळ 'करनूल इंटरसिटी'ची एमएमटीएसला धडक; 10 प्रवासी गंभीर - Karnool intercity express passengers critically injured

काचीगुडा रेल्वे स्थानकाजवळ एमएमटीएस रेल्वे आणि करनूल इंटरसिटी एक्स्प्रेसची धडक झाली. दक्षिण-मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही रेल्वे गाड्यांचे डब्बे अक्षरश: चेपले आहेत.

एमएमटीएस रेल्वे आणि करनूल इंटरसिटी एक्स्प्रेस आपापसात धडकल्या

By

Published : Nov 11, 2019, 12:45 PM IST

Updated : Nov 11, 2019, 1:03 PM IST

हैदराबाद -एमएमटीएस रेल्वे आणि करनूल इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये अपघात झाला. काचीगुडा रेल्वे स्थानकाजवळ दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेत जवळपास १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

एमएमटीएस रेल्वे आणि करनूल इंटरसिटी एक्स्प्रेस आपापसात धडकल्या

दक्षिण मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही रेल्वे गाड्यांचे डब्बे अक्षरश: चेपले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Nov 11, 2019, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details